भारतीय क्रिकेट संघाला मॅच फीच्या 80 टक्के दंड, का? येथे वाचा

भारतीय क्रिकेट संघाला मॅच फीच्या 80 टक्के दंड

IND VS BAN ODI SERIES : भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळला गेला. हा रोमांचक सामना बांगलादेशने एका विकेटने जिंकला.

भारतीय क्रिकेट संघाला मॅच फीच्या 80 टक्के दंड, का? येथे वाचा
Advertisements

या पराभवानंतर टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे. ICC ने सोमवारी भारतीय क्रिकेट संघाला पहिल्या वनडे सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी त्यांच्या मॅच फीच्या 80 टक्के दंड ठोठावला आहेत.

आयसीसीने एका निवेदनात म्हटले आहे. मॅच रेफरी रंजन मदुगले यांना आढळले की टीम इंडियाने पहिल्या वनडेमध्ये निर्धारित वेळेपेक्षा 4 षटके कमी टाकली आहेत. याच कारणामुळे टीम इंडियाला शिक्षा झाली आहे.

आयसीसीने म्हटले की, नियम 2.22 नुसार, खेळाडूंना त्यांच्या संघाच्या निर्धारित वेळेत प्रत्येक षटकाच्या विलंबासाठी त्यांच्या मॅच फीच्या 20 टक्के दंड आकारला जातो.

नमस्कार, माझे नाव माहेश्वरी सोनार ,माझे शिक्षण-(Comp Eng). मी एक व्हॉलीबॉल खेळाडू असुन मी माझ्या माहितीच्या अधारावर आणि स्पोर्ट खेलोच्या माध्यमातुन आपल्या सर्वांनपर्यंत स्पोर्टबद्दल जास्तीत जास्त माहिती पोहचवण्याचा पर्यंत्न करेल

Leave a Comment