भारतीय क्रिकेट संघाला मॅच फीच्या 80 टक्के दंड
IND VS BAN ODI SERIES : भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळला गेला. हा रोमांचक सामना बांगलादेशने एका विकेटने जिंकला.

या पराभवानंतर टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे. ICC ने सोमवारी भारतीय क्रिकेट संघाला पहिल्या वनडे सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी त्यांच्या मॅच फीच्या 80 टक्के दंड ठोठावला आहेत.
आयसीसीने एका निवेदनात म्हटले आहे. मॅच रेफरी रंजन मदुगले यांना आढळले की टीम इंडियाने पहिल्या वनडेमध्ये निर्धारित वेळेपेक्षा 4 षटके कमी टाकली आहेत. याच कारणामुळे टीम इंडियाला शिक्षा झाली आहे.
आयसीसीने म्हटले की, नियम 2.22 नुसार, खेळाडूंना त्यांच्या संघाच्या निर्धारित वेळेत प्रत्येक षटकाच्या विलंबासाठी त्यांच्या मॅच फीच्या 20 टक्के दंड आकारला जातो.
More bad news for India after yesterday’s loss against Bangladesh 👇https://t.co/MVHYjwUPbq
— ICC (@ICC) December 5, 2022