India beat England by 8 Wickets : मंधानाच्या ७९* धडाकेबाज खेळीने भारताने इंग्लंडचा पराभव करून मालिकेत बरोबरी साधली

India beat England by 8 Wickets : भारताने २ बाद १४६ (मंधाना ७९*) इंग्लंडचा ७ बाद १४२ (केम्प ५१*, राणा ३-२४) ८ गडी राखून पराभव केला.

India beat England by 8 Wickets
Advertisements

India Women tour of England 2022 : इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा संघ जाहीर, तारिख, ठिकाण, संघ

Index

India beat England by 8 Wickets

स्मृती मंधानाच्या शानदार नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताने तीन टी-२० सामन्यांच्या २-या सामन्यात इंग्लंडवर २० चेंडू राखून विजय मिळवला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.

मॅच सारांश

  • इंग्लंड महिला विरुद्ध भारत महिला, दुसरी टी-२०, भारतीय महिला इंग्लंड दौरा
  • इंग्लंड महिला – १४२/६ (२० ओव्हर)
  • भारतीय महिला – १४६/२ (१६.४ ओव्हर)
  • भारतीय महिलांनी ८ गडी राखून विजय मिळवला

१७ वर्षीय फ्रेया केम्पच्या विक्रमी अर्धशतकानंतरही भारतीय महिलांनी डर्बी येथे व्हिटॅलिटी IT20 मालिकेत ८ गडी राखून शानदार विजय मिळवला.

इंग्लंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला परंतु त्याची सुरुवात खराब झाली, ५४-५ अशी स्थीती होती. 

साउदर्न वायपर्सचे सहकारी केम्प आणि मायिया बाउचियर (३४) यांनी सहाव्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी करत यजमानांना १४२-६ अशी मजल मारली.

केम्पची अर्धशतक खेळी ही IT20 क्रिकेटमधील इंग्लिश महिलेची आतापर्यंतची सर्वात तरुण आणि सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील इंग्लंड महिलांसाठी दुसरी सर्वात तरुण होती.

स्मृती मंधानाने स्वत: ७९* धावा केल्या आणि नाबाद राहिली.

गुरुवारी ब्रिस्टलमध्ये दोन्ही संघ मालिकेतील शेवटचा सामना खेळणार आहेत.

नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment