ICC T20 World Cup 2022 : वेगवान गोलंदाज दीपक चहर बाहेर; सिराज, शमी, शार्दुल भारतीय संघात सामील होणार

ICC T20 World Cup 2022 : T20 World Cup साठी टीम इंडियाच्या स्टँडबाय मध्ये असलेला दीपक चहर पाठीच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाला जाऊ शकणार नाही. त्याला स्टँड बाय लिस्टमधून काढून टाकण्यात आले आहे. 

ICC T20 World Cup 2022 : वेगवान गोलंदाज दीपक चहर बाहेर; सिराज, शमी, शार्दुल भारतीय संघात सामील होणार
ICC T20 World Cup 2022 Squad
Advertisements

यासोबतच दीपकच्या जागी शार्दुल ठाकूरला राखीव खेळाडू म्हणून घेण्यात आले आहे. त्याचवेळी शार्दुलसह मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज हे देखील गुरुवारी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहेत. 

ICC T20 World Cup 2022

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘दीपकला तंदुरुस्त होण्यासाठी थोडा वेळ लागेल. त्याची पाठदुखी पुन्हा उफाळून आली आहे. त्यामुळे बीसीसीआय मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर या तीन खेळाडूंना ऑस्ट्रेलियाला पाठवत आहे.

दीपक चहर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेचा भाग होता. यानंतर पाठदुखीमुळे तो एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला. तो सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये पुनर्वसन करत आहे.

भारतीय संघ गेल्या आठवड्यातच ऑस्ट्रेलियात पोहोचला असून सराव सामने खेळण्यासही सुरुवात केली आहे.

खरे तर शार्दुलने आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत सांगितले होते की, विश्वचषक स्पर्धेत नसल्यामुळे मी खूप निराश आहे, विश्वचषक खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते.

तो २०२३ मध्ये भारतात होणाऱ्या विश्वचषकाबद्दल बोलत होता. पण त्याचं स्वप्न यावेळीच पूर्ण होत आहे. जरी तो राखीव खेळाडू म्हणून जात असला तरी तो संघाचा भाग होऊ शकतो आणि स्पर्धा देखील करू शकतो.

नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment