आयसीसीने टूर्नामेंटमधील सर्वोत्तम खेळाडूंची यादी जाहीर केली, भारताच्या ‘या’ तीन खेळाडूंचा समावेश
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) सोमवारी १४ नोव्हेंबर २०२२ रोजी टी-२० विश्वचषक २०२२ चा सर्वोत्तम खेळाडूंची यादी जाहीर केली. आयसीसीने या संघामध्ये एकूण १२ खेळाडूंना स्थान दिले आहे. यामध्ये ४ इंग्लंड तर भारताचे २ जणांचा समावेश आहे. पाकिस्तानचे दोन तर न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेच्या प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश आहे.
आयसीसीने टूर्नामेंटमधील सर्वोत्तम खेळाडूंची यादी जाहीर केली
आयसीसीने सलामीवीर म्हणून जोस बटलर (Jos Buttler) आणि ऍलेक्स हेल्स यांना निवडले, ज्यांनी इंग्लंडला चॅम्पियन बनवण्यात महत्वाची भुमिका पार पाडली. टीम ऑफ द टुर्नामेंटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली (Virat Kohli) आहे. त्याने ६ डावांमध्ये ४ अर्धशतकांच्या जोरावर २९६ धावा केल्या.
४थ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव आहे. त्याने काही विलक्षण खेळी करत संघाच्या विजयात महत्वाची भुमिका बजावली. ५व्या क्रमांकावर न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्स आहे, त्याने एका शतकाच्या सहाय्याने या स्पर्धेत २०१ धावा केल्या. झिम्बाब्वेचा सिकंदर रझा सहाव्या स्थानावर आहे. त्याने आपल्या अष्टपैलू कामगिरीने चाहत्यांचे मन जिंकले. झिम्बाब्वेने पाकिस्तानला पराभूत केले होते.
७व्या क्रमांकावर पाकिस्तानचा शादाब खान आहे. त्याने गोलंदाजीबरोबरच फलंदाजीतही उत्तम प्रदर्शन केले. ८व्या क्रमांकावर इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करन आहे, जो मालिकावीरही ठरला. ९व्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिच नोर्तजे, १०व्या स्थानावर इंग्लंडचाच मार्क वूड आहे
टी-२० विश्वचषक २०२२ – टीम ऑफ द टुर्नामेंट
जोस बटलर (इंग्लंड), ऍलेक्स हेल्स (इंग्लंड), विराट कोहली (भारत), सूर्यकुमार यादव (भारत), ग्लेन फिलिप्स (न्यूजीलंड), सिकंदर रझा (झिम्बाब्वे), शादाब खान (पाकिस्तान), सॅम करन (इंग्लंड), एनरिक नोर्त्जे (दक्षिण आफ्रिका), मार्क वूड (इंग्लंड)
Four 🏴 players and two each from 🇵🇰 and 🇮🇳
— ICC (@ICC) November 14, 2022
The @upstox Most Valuable Team of the Tournament ⬇️#T20WorldCup https://t.co/wdGDTWMiUA