स्विस ओपन: एचएस प्रणॉय उपविजेते

HS Prannoy finishes runner-up : सेंट जेकोबशाले मैदानावर ४८ मिनिटे चाललेल्या स्विस ओपन २०२२ च्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत भारतीय शटलर एचएस प्रणॉयला इंडोनेशियाच्या जोनाटन क्रिस्टीकडून १२-२१, १८-२१ ने पराभव पत्करावा लागला.

प्रणॉयने पहिल्या गेममध्ये सलग सात गुण गमावले. त्यामुळे त्याच्या हातून खेळ सहज निसटला. 

इंडोनेशियन खेळाडूने त्याला एकही पॉइंट सहजासहजी घेऊ दिला नाही. दुसऱ्या गेममध्येही प्रणॉयने सुरुवातीची झुंज दिल्यानंतर तो भरकटला. 

याचा फायदा घेत जोनाथन क्रिस्टीने निर्णायक आघाडी घेतली.  प्रणॉयने सलग पाच गुण घेतले पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment