FIFA U-17 Women World Cup 2022 : FIFA अंडर-१७ विश्वचषक २०२२ साठी भारताच्या U-१७ राष्ट्रीय महिला संघाची बुधवारी घोषणा करण्यात आली. विश्वचषक पुढील आठवड्यात सुरू होणार आहे.

भारताला अ गटात अमेरिका, मोरोक्को आणि ब्राझील सोबत जोडण्यात आले आहे. भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर ११ ऑक्टोबरला त्यांचा सामना अमेरिकेशी, त्यानंतर १४ ऑक्टोबर आणि १७ ऑक्टोबरला मोरोक्को आणि ब्राझीलशी होईल.
फीफा विश्वचषक २०२२ तारखा, ड्रॉ, वेळापत्रक, किक-ऑफ वेळा, PDF
FIFA U-17 Women World Cup 2022
विश्वचषक पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक थॉमस डेनरबी (Thomas Dennerby) यांनी २१ खेळाडूंच्या संघाची घोषणा केली. भारताला अ गटात अमेरिका, मोरोक्को आणि ब्राझील सोबत जोडण्यात आले आहे.
भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर (Kalinga Stadium) त्यांचा सामना 11 ऑक्टोबरला यूएसए, त्यानंतर 14 ऑक्टोबर आणि 17 ऑक्टोबरला मोरोक्को आणि ब्राझीलशी होईल. ही प्रत्येकासाठी नवीन परिस्थिती आहे. भारताने यापूर्वी कधीही विश्वचषक खेळलेला नाही.
भारतीय अंडर-१७ राष्ट्रीय महिला संघ:
FIFA अंडर-१७ महिला विश्वचषक २०२२ साठी भारताचा संघ
गोलकीपर: मोनालिशा देवी मोइरंगथेम, मेलोडी चानू केशम, अंजली मुंडा
बचावपटू: अस्तम ओराव, काजल, नकेता, पूर्णिमा कुमारी, वर्षाका, शिल्की देवी हेमाम
मिडफिल्डर्स: बबिना देवी लिशम, नितू लिंडा, शैलजा, शुभांगी सिंग
फॉरवर्ड: अनिता कुमारी, लिंडा कोम सेर्टो, नेहा, रेजिया देवी लैश्राम, शेलिया देवी लोकटोंगबम, काजोल हुबर्ट डिसूझा, लावण्य उपाध्याय, सुधा अंकिता तिर्की
🚨 ANNOUNCEMENT 🚨
— Indian Football Team (@IndianFootball) October 5, 2022
Here's the list of 2⃣1️⃣ Young Tigresses 🐯, who will be fighting for 🇮🇳 in the FIFA U-17 Women's World Cup 🤩#U17WWC 🏆 #BackTheBlue 💙 #ShePower 👧 #IndianFootball ⚽ pic.twitter.com/q2ClqkSinm