इंग्लंडची विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक
फीफा विश्वचषक 2022 : इंग्लंड वि सेनेगल मध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडने सेनेगलचा 3-0 ने पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. संपूर्ण सामन्यात सेनेगलला एकदाही गोल करण्याची संधी इंग्लंडच्या खेळाडूंनी दिली नाही. अता उपांत्यपूर्व फेरीत शनिवारी (ता. १०) इंग्लंड आणि फ्रान्स यांच्यात लढत होईल.

सामन्याच्या प्रारंभापासूनच इंग्लंडच्या आक्रमणाला धार होती. इंग्लंडने सामन्याच्या ३८ व्या मिनिटाला बेलिंगहॅमच्या पासवर जॉर्डन हेंडरसनने मनगलच्या गोलरक्षक एदुआर्द मेंडीला चकविले आणि पहिला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर सेनेगलने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पूर्वार्धातील अतिरिक्त वेळेत ४६ मिनिटाला हॅरी केनने आणखी एक गोल करून इंग्लंडची आघाडी वाढविली.
🤩 Harry Kane is off the mark in Qatar – another commanding performance tonight and finally that elusive goal.
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 4, 2022
England’s captain is tonight’s #Budweiser Player of the Match, as voted by you.
🇸🇳 #SENENG 🏴 #POTM #YoursToTake #BringHomeTheBud pic.twitter.com/pPdsrJUYU9
उत्तरार्धात इंग्लंडने प्रारंभी काही वेळ काढूपणाचे धोरण अवलंबिले. मात्र, त्याचा फारसा फायदा सेनेगलच्या आक्रमकांना घेता आला नाही. पुढे कौलुबेलीच्या पासवर बुकायो साका याने ५७ व्या मिनिटाला इंग्लंडकडून आणखी एक गोल केला आणि विजयी आघाडी घेतली. या पराभवाबरोबरच सेनेगलचे आव्हानही संपुष्टात आले.
अता उपांत्यपूर्व फेरीत शनिवारी (ता. १०) इंग्लंड आणि फ्रान्स यांच्यात लढत होईल.