CWG 2022 Day 10 Result : २०२२ च्या बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्सच्या १० व्या दिवशी भारताने ५ सुवर्ण पदकांसह १५ पदके जिंकली.
वेगवेगळ्या गटातील विजेते पाहूया..

CWG 2022 Day 10 Result
हॉकी: भारतीय महिला संघाने शूटआऊटमध्ये न्यूझीलंडचा २-१ असा पराभव करत कांस्यपदक पटकावले.
क्रिकेट अंपायरला किती पगार असतो तुम्हाला माहित आहे का?
क्रिकेट: भारतीय महिला संघाला अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून ९ धावांनी पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
स्क्वॉश: मिश्र दुहेरीत सौरव घोषाल आणि दीपिका पल्लीकल जोडीने कांस्यपदक पटकावले. भारतीय जोडीने कांस्यपदकाच्या प्ले-ऑफमध्ये ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरॉन पिली आणि डोना लोबन यांचा सरळ सेटमध्ये पराभव केला.
महिलांच्या T20I क्रिकेटमधील सर्वात कमी धावसंख्या
बॉक्सिंग: भारताने १० व्या दिवशी ३ सुवर्ण, १ रौप्य आणि ३ कांस्य पदकांसह बॉक्सिंग मोहीम पूर्ण केली.
- महिलांच्या ४८ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत नितू घनघासने इंग्लंडच्या डेमी-जेड रेझ्टनचा एकमताने ५-० असा पराभव करून विजय मिळवला.
- अमित पंघलने पुरुषांच्या ५१ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत इंग्लंडच्या कियारन मॅकडोनाल्डचा ५-० असा एकमताने पराभव केला.
- निखत जरीनने महिलांच्या ५० किलो वजनी गटात उत्तर आयर्लंडच्या कार्ली मॅक नॉलचा ५-० असा पराभव करत सुवर्णपदक पटकावले.
CWG 2022 Day 10 Result
टेबल टेनिस: मिश्र दुहेरीत अचंता शरथ कमल आणि श्रीजा अकुला या जोडीने सुवर्णपदक जिंकले. भारतीय जोडीने अंतिम फेरीत मलेशियाच्या चुंग जावेन/लीने केरेनचा ३-१ असा पराभव केला.
- पुरुष दुहेरीत अचंता शरथ कमल आणि साथियान ज्ञानसेकरन या जोडीला अंतिम फेरीत इंग्लंडच्या लियाम पिचफोर्ड आणि पॉल ड्रिंकहल यांच्याकडून २-३ ने पराभूत होऊन रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
- पुरुष एकेरीत अचंता शरथ कमलने अंतिम फेरीत प्रवेश केला, तर साथियान ज्ञानसेकरन उपांत्य फेरीत पराभूत झाला. शरथने पॉल ड्रिंखॉलचा ४-२ असा पराभव केला तर साथियानला लियाम पिचफोर्डकडून १-४ ने पराभव पत्करावा लागला.
CWG 2022 Day 10 Result : भारतीय खेळाडूंनी १० व्या दिवशी जिंकली १५ पदके
बॅडमिंटन: भारतीय शटलरने २ कांस्यपदके घेतली आणि ३ स्पर्धांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
- लक्ष्य सेनने पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत सिंगापूरच्या जेसन तेहचा २१-१०, १८-२१, २१-१६ असा पराभव केला.
- किदाम्बी श्रीकांतला उपांत्य फेरीत मलेशियाच्या एनजी त्झे योंगकडून २१-१३, १९-२१, १०-२१ असा पराभव पत्करावा लागला. श्रीकांतने नंतर कांस्यपदकाच्या प्ले-ऑफमध्ये जेसन तेहचा २१-१५, आणि २१-१८ असा पराभव केला.
- पीव्ही सिंधूने महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत सिंगापूरच्या येओ जिया मिनचा २१-१९, आणि २१-१७ असा पराभव केला. अंतिम फेरीत तिची लढत कॅनडाच्या मिशेल लीशी होणार आहे.
CWG 2022 Day 10 Result
अॅथलेटिक्स: भारताने १०व्या दिवशी अॅथलेटिक्समध्ये ४ पदके घेतली.
- एल्डोस पॉलने पुरुषांच्या तिहेरी उडीत १७.०३ मीटर उडीसह सुवर्णपदक पटकावले तर अबूबकरने १७.०२ मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नात रौप्यपदक पटकावले. प्रवीण चित्रवेल १६.८९ मीटर प्रयत्नांसह ४ व्या स्थानावर राहिला आणि ०.०३ मीटरने कांस्यपदकापासून वंचित राहिला.
- संदीप कुमारने पुरुषांच्या १०,००० मीटर चालण्याच्या शर्यतीत ३८:४९.२१ या वेळेत कांस्यपदक पटकावले.
- अन्नू राणीने महिलांच्या भालाफेकमध्ये ६०.०० मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नात कांस्यपदक मिळवले.
Source – CWG 2022