फुटबॉलचा बादशाहा ख्रिस्तियानो रोनाल्डो हा सर्वात जास्ती मानधन घेणारा खेळाडू आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डो हा खेळाडू एक विलक्षण चॅलेंजर आहे त्यामुळे तो आता तो जगभरात प्रसिद्ध आहे. त्याचे इंस्टाग्रामवर 500 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
इंस्टाग्रामवर 500 दशलक्ष फॉलोअर्स
५०० दशलक्ष चाहते असण्याचा नवीन टप्पा गाठणारा ख्रिस्तियानो रोनाल्डो हा पहिला व्यक्ती आहे. रोनाल्डोच्या चाहत्यांसाठी हा अभिमानास्पद क्षण आहे. रोनाल्डोने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यात त्याने त्याचे सर्व व्यावसायिक हायलाइट्स संकलित केले आहेत.
त्याच्या अप्रतिम कामगिरीमुळे आणि कर्तृत्वामुळे त्याला लोकप्रियता आणि प्रेम लाभले आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “500 मिलियन फॉलोअर्स! माझं आयुष्य, करिअर आणि विचार, तुमच्याशी नेहमीच शेअर केले.
तू माझ्या कथेचा एक भाग आहेस आणि आम्ही एकत्र येऊन खूप काही साध्य केलं आहे. मी स्वप्न पाहू शकत होतो त्यापेक्षा जास्त. प्रत्येक पोस्ट, प्रत्येक क्षण, आपला पाठिंबा. धन्यवाद!”
या स्टारने हे त्याच्या इंस्टाग्राम वरही आपल्या चाहत्यांचे आभार मानले. रोनाल्डोने अनेकांची मने मोहून टाकली असून तो सर्वाधिक कमाई करणारा मानकरी ठरला आहे.