कॅमरूनने ब्राझीलला हारवत रचला इतिहास
फीफा विश्वचषक 2022 च्या स्पर्धेत आतापर्यंत अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. शुक्रवारी उशिरा रात्री ग्रुप जी मध्ये ब्राझील विरुद्ध कॅमेरून (Brazil vs Cameroon) सामना लुसेल स्टेडियमवर झाला. या सामन्यात कॅमेरूनने रोमांचक विजय मिळवत सगळ्यांना आश्चर्यचकित केले. मात्र हा सामना जिंकून सुद्धा कमॅरूनला सुपर 16 मध्ये स्थान मिळाले नाही.
कॅमरूनने ब्राझीलला हारवत रचला इतिहास
ब्राझीलला साखळी फेरीचा अंतिम सामना कॅमेरुन विरुद्ध 0-1 असा गमाववा लागला. हा गोल कॅमेरूनच्या विन्सेंट अबौबकर याने अतिरिक्त वेळेत केला. या विजयाबरोबरच कॅमेरून विश्वचषकाच्या इतिहासात पहिला आफ्रिकी संघ ठरला ज्यांनी ब्राझीलचा पराभव केला.
विन्सेंटने सामन्याच्या 92व्या मिनिटाला गोल केला आणि त्याने विचित्र सेलेब्रेशन केल्याने त्याला पुढच्याच मिनिटाला रेड कार्ड मिळाले, मात्र हा सामना चाहते कधीच विसरणार नाही.
A story in four parts.
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 2, 2022
This #FIFAWorldCup Group Stage is providing drama right until the very end! pic.twitter.com/v7iviclvYH
ब्राझीलने आधीच अंतिम 16 मध्ये जागा पक्की केली होती. 24 वर्षानंतर ब्राझीलने विश्वचषकाच्या साखळी फेरीतील सामना गमावला. याआधी त्यांना 1998 च्या विश्वचषकात नॉर्वे विरुद्ध 1-2 असा सामना गमवावा लागला होता. सुपर 16 मध्ये ब्राझीलचा सामना दक्षिण कोरियाविरुद्ध 6 डिसेंबरला आहे.
🇨🇲 Cameroon v 🇧🇷 Brazil did not let us down with the drama 🔥
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 2, 2022
See highlights on FIFA+