फिफा विश्वचषक २०२२ साठी ब्राझील स्कॉड जाहीर, फर्मिनो, कोटिन्हो विश्रांती

फिफा विश्वचषक २०२२ साठी ब्राझील स्कॉड जाहीर : ज्या फिफा विश्वचषक २०२२ ची वाट बघत आहेत तो येत्या २० नोव्हेंबरला चालू होणार आहे. आतापर्यंत ५ वेळा फिफा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ब्राझीलने आगामी फिफा वर्ल्ड कप २०२२ साठी आपला २६ सदस्यांचा संघ जाहीर केला आहे.

फिफा विश्वचषक २०२२ बाझील स्कॉड जाहीर, फर्मिनो, कोटिन्होला विश्रांती
फिफा विश्वचषक २०२२ साठी ब्राझील स्कॉड जाहीर
Advertisements

फिफा विश्वचषक २०२२ साठी ब्राझील स्कॉड जाहीर

कतारमध्ये येत्या २० नोव्हेंबर २०२२ पासून फिफा विश्वचषक २०२२ (FIFA WC 2022) स्पर्धेला सुरुवात होत आहे. या दरम्यान प्रत्येक देश आप-आपला संघ जाहीर करताना दिसत आहे. दरम्यान सोमवारी ब्राझीलने आपल्या २६ सदस्यीय संघाची घोषणा केली.

अ‍ॅस्टन व्हिलाचा स्टार स्ट्रायकर फिलिप कोटिन्हो दुखापतीमुळे संघात नसून दुसरीकडे, विंची, गॅब्रिएल, पेड्रो या युवा वेगवान फॉरवर्ड खेळाडूंना स्थान दिल्याने लिव्हरपूलचा स्टार फॉरवर्ड फर्मिनोला संघाबाहेर ठेवण्यात आलं आहे.

ब्राझीलच्या २६ जणांच्या संघात १२ खेळाडू इंग्लिश प्रीमियर लीग खेळणार आहेत. दरम्यान ब्राझील आपला विश्वचषकातील पहिला सामना २४ नोव्हेंबर रोजी सर्बियाविरुद्ध खेळणार आहे.

ग्रुप स्टेजचे सामने २० नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान खेळवले जातील. सामन्याबद्दल सपुंर्ण माहिती तुम्हाला खालील लिंक वर मिळेल

👇

फीफा विश्वचषक २०२२ तारखा, ड्रॉ, वेळापत्रक, किक-ऑफ वेळा, PDF


फिफा विश्वचषक २०२२ साठी फायनल ब्राझीलचा संघ

Advertisements

  • गोलकिपर: एलिसन (लिव्हरपूल), एडरसन (मँचेस्टर सिटी), वेव्हर्टन (पाल्मेरियास)
  • डिफेन्डर : ब्रेमर (जुव्हेंटस), अ‍ॅलेक्स सँड्रो (जुव्हेंटस), एडर मिलिटो (रिअल माद्रिद), मार्किनोस (पीएसजी), थियागो सिल्वा (चेल्सी), डॅनिलो (जुव्हेंटस), डॅनियल अल्वेस (पुमास), अ‍ॅलेक्स टेलेस (सेव्हिला)
  • मिडफिल्डर: ब्रुनो गुइमेरेझ (न्यूकॅसल युनायटेड), कासेमिरो (मँचेस्टर युनायटेड), फ्रेड (मँचेस्टर युनायटेड), एव्हर्टन रिबेरो (फ्लेमेंगो), फॅबिन्हो (लिव्हरपूल), लुकास पॅक्वेटा (वेस्टहॅम)
  • फॉरवर्ड्स: अँटोनी (मँचेस्टर युनायटेड), गॅब्रिएल जीसस (आर्सनल), गॅब्रिएल मार्टिनेली (आर्सनल), नेमार ज्यू. (पीएसजी), पेड्रो (फ्लेमेन्गो), राफिन्हा (बार्सिलोना), रिकारलिसन (टोटेनहॅम), रॉड्रिगो (रिआल माद्रिद), विंची ज्युनियर (रिआल माद्रिद)

नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment