१४ वर्षीय अनाहत सिंग जर्मनीतील ज्युनियर स्क्वॉश मीट विजेती | Anahat Singh Wins Junior Squash Meet

१४ वर्षीय अनाहत सिंगने (Anahat Singh Wins Junior Squash Meet) तिची विजयी मालिका सुरू ठेवली आणि हॅम्बुर्ग येथे जर्मन ज्युनियर ओपन स्क्वॉश चॅम्पियनशिप सुपर सीरिज स्पर्धा जिंकली.

अनाहतने अत्ता पर्यंत ४६ राष्ट्रीय सर्किट विजेतेपद, २ राष्ट्रीय विजेतेपद आणि ९ आंतरराष्ट्रीय विजेतेपदे जिंकली आहेत.


पूजा गहलोत वय, वजन, पती, कुटुंब, चरित्र आणि बरेच काही

१४ वर्षीय अनाहत सिंग जर्मनीतील ज्युनियर स्क्वॉश मीट विजेती

Anahat Singh Wins Junior Squash Meet

गेल्या शुक्रवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेचा सोमवारी समारोप झाला.

अंतिम फेरीत, दिल्लीच्या १४ वर्षीय अनाहत सिंगने १५ वर्षाखालील मुलींच्या गटात इजिप्तच्या मलाक समीरचा ३-० असा पराभव केला.

तिने उपांत्य फेरीत मलेशियाच्या अव्वल मानांकित व्हिटनी इसाबेल विल्सनचा ३-१ असा आणि उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमच्या सवाना मोक्सहॅमचा पराभव करत अंतिम फेरी गाठली.


कोण आहे अनाहत सिंग? | Who Is Anahat Singh?

यूएस ज्युनियर ओपन स्क्वॉश चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय, अनाहत एक किशोरवयीन आहे.

तसेच, ४६ नॅशनल सर्किट टायटल्स, २ नॅशनल चॅम्पियनशिप आणि ९ इंटरनॅशनल टायटल्स धारक अनाहत ही मूळची नवी दिल्लीचा आहे.

तिने २०१९ मध्ये युरोपियन ज्युनियर स्क्वॉश ओपन आणि DPD डच ज्युनियर ओपन यासह प्रमुख विजेतेपद जिंकून आपली क्षमता सिद्ध केली आहे. 

वयाच्या ६ व्या वर्षी पासून अनाहत बॅडमिंटन खेळत होती आणि तिने दिल्लीतील अनेक स्पर्धा जिंकल्या.

जेव्हा ती ८ वर्षांची होती तेव्हा ती स्क्वॅशकडे वळाली.

११ वर्षांखालील स्पर्धा खेळताना, स्क्वॉशपटू मुलींच्या ११ वर्षांखालील गटात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी राहिली.

नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment