लक्ष्य सेन इतिहास रचण्यापासून थोडक्यात हुकला, रौप्य पदकावर समाधान

AlAll England Open 2022 Final : भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम लढतीत सामना २१-१०, २१-१५ अशा फरकाने गमावला आहे.

Lakshya Sen All England Open 2022 Final:

ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताचा लक्ष्य सेन थोडक्यात पराभूत झाला आहे. डेन्मार्कच्या व्हिक्टर ऍक्सेलसेनने (All England Open 2022) त्याला अंतिम सामन्यात दोन सेट्समध्ये मात दिली आहे.

या विजय मिळवून लक्ष्य सेनला इतिहास रचण्याची संधी होती. हा सामना जिंकल्यास तब्बल २१ वर्षानंतर भारताने या स्पर्धेत विजय मिळवला असता.  

लक्ष्यला नमवलेला व्हिक्टर सध्या जगातील अव्वल दर्जाचा बॅडमिंटनपटू असून लक्ष्यही भारताचा आघाडीचा खेळाडू आहे. लक्ष्यने अप्रतिम कामगिरी करत अंतिम सामन्यापर्यंत धडक घेतली होती. पण या महत्त्वाच्या सामन्यात सुरुवातीपासून व्हिक्टरने सामन्यावर एकहाती वर्चस्व ठ
ठेवलं.

पहिला सेट २१-१० अशा मोठ्या फरकाने गमावल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये लक्ष्यने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. पण अखेर शेवटच्या काही मिनिटांत व्हिक्टरने दमदार पुनरागमन करत २१-१५ च्या फरकाने सेट जिंकला आणि सामनाही नावावर केला. त्यामुळे लक्ष्य अगदी थोडक्यात इतिहास रचण्यापासून हुकला आहे. 

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार माहिती

इंग्लंड ओपन स्पर्धेत भारताची कामगिरी

१९४७ मध्ये प्रकाश नाथ, १९८० आणि १९८१मध्ये प्रकाश पदुकोण आणि २००१ मध्ये पुलेला गोपीचंद आणि २०१५ मध्ये सायना नेहवाल यांनी ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रकाश पदुकोण यांनी १९८० मध्ये तर, पुलेला गोपीचंद यांनी २००१मध्ये इंग्लंड ओपन स्पर्धेचा खिताब जिंकला होता. लक्ष्यनं आजचा सामना जिंकला असता तर तो ही स्पर्धा जिंकणारा तो तिसरा भारतीय खेळाडू ठरला असता.

नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment