All About FIFA World Cup 2022 : फुटबॉलच्या महासंग्रामाला काही दिवसात सुरवात, स्पर्धेबाबत सर्व माहिती जाणून घ्या…

All About FIFA World Cup 2022 : फुटबॉलचा विश्वचषक म्हणजे फीफा विश्वचषक २०२२ यंदा कतारमध्ये खेळवला जात आहे. पहिला सामना यजमान कतार आणि इक्वाडोर संघात २० नोव्हेंबर २०२२ रोजी खेळवला जाणार आहे.

All About FIFA World Cup 2022 : फुटबॉलच्या महासंग्रामाला काही दिवसात सुरवात, स्पर्धेबाबत सर्व माहिती जाणून घ्या...
All About FIFA World Cup 2022
Advertisements

क्रिकेटच्या तुलनेतही अधिक प्रसिद्ध असणाऱ्या फुटबॉलचा विश्वचषक २०२२ यंदा कतार येथे पार पडत आहे. दरम्यान कतारमध्ये होणार्‍या यंदाच्या फिफा वर्ल्डकपला (FIFA WC 2022) फक्त १६ दिवस शिल्लक राहिले आहेत.

या स्पर्धेत जगभरातील फुटबॉल खेळणारे ३२ सर्वोत्तम संघ सहभागी होत असून, ही स्पर्धा २० नोव्हेंबर ते १८ डिसेंबर २०२२ या कालावधीत पार पडणार आहे.


All About FIFA World Cup 2022

फिफा विश्वचषक २०२२ ग्रुप

  • ग्रुप A : कतार, इक्वेडोर, सेनेगल, नेदरलँड
  • ग्रुप B : इंग्लंड, इराण, अमेरिका, वेल्स
  • ग्रुप C : अर्जेंटिना, सौदी अरेबिया, मेक्सिको, पोलंड
  • ग्रुप D : फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, ट्युनिशिया
  • ग्रुप E: स्पेन, कोस्टा रिका, जर्मनी, जपान
  • ग्रुप F: बेल्जियम, कॅनडा, मोरोक्को, क्रोएशिया
  • ग्रुप G : ब्राझील, सर्बिया, स्वित्झर्लंड, कॅमेरून
  • ग्रुप H: पोर्तुगाल, घाना, उरुग्वे, कोरिया प्रजासत्ताक

फिफा वर्ल्ड कप २०२२ चा फॉर्मेट

ग्रुप स्टेजमध्ये, प्रत्येक संघ त्यांच्या गटातील इतर ३ संघांविरुद्ध एक सामना खेळेल. प्रत्येक गटातील टॉप २ संघ राऊंड ऑफ १६ च्या फेरीत प्रवेश करतील. जिथून बाद फेरीचे सामने सुरू होतील.

राऊंड ऑफ १६ मध्ये एकूण ८ सामने होतील, ज्यामध्ये १६ पैकी आठ संघ सामना जिंकून उपांत्यपूर्व फेरीत पोहोचतील. उपांत्यपूर्व फेरीत ४ सामने होणार असून विजयी चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. उपांत्य फेरीनंतर अंतिम सामना १८ डिसेंबरला खेळवला जाईल.


Fifa वर्ल्ड कपचे वेळापत्रक

फीफा विश्वचषकाचे पुर्ण वेळापत्रक तुम्हाला येथे Download कराता येईल.

👇

PDF DOWNLOAD

फिफा वर्ल्ड कप २०२२ चे सामने कुठे होणार?

हे सर्व सामने कतारच्या वेगवेगळ्या ८ स्टेडियममध्ये खेळवले जातील. संपूर्ण विश्वचषकात ६४ सामने होणार आहेत. अंतिम-४ मध्ये पोहोचणारे संघ प्रत्येकी ७-७ सामने खेळतील.


फिफा वर्ल्ड कप २०२२ चे लाइव्ह टेलिकास्ट आणि स्ट्रीमिंग कुठे बघू शकता?

Viacom-१८ कडे भारतातील FIFA विश्वचषक २०२२ चे प्रसारण हक्क आहेत. ज्यामुळे स्पोर्ट्स-१८ आणि स्पोर्ट्स-१८ एचडी चॅनेलवर सामन्यांचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तसंच VOOT Select आणि Jio TV वर सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.

नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment