बांगलादेशवर भारताचा १-० असा विजय
सुनील छेत्रीने निर्णायक गोल नोंदवून भारताला स्पर्धेतील पहिला विजय मिळवून दिला.
भारतीय फुटबॉल संघाने आज बांगलादेशवर १-० असा विजय नोंदवून २०२३ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आशा जिवंत ठेवल्या. चीनविरुद्धच्या ५-१ अशा पराभवातून सावरलेल्या टीम इंडियाने सामन्याला फक्त ७ मिनिटे शिल्लक असताना गोल करून आंतरखंडीय स्पर्धेतून बाद होण्याची शक्यता कमी केली.
भारतीय कर्णधार सुनील छेत्रीने निर्णायक गोल नोंदवत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि भारतीय संघाला स्पर्धेतील पहिला विजय मिळवून दिला.
सुरुवातीला बांगलादेश संघाचे आक्रमण हाणून पाडण्यात भारतीय बचावफळीला यश आले, पण खेळात ३० मिनिटे उलटून गेल्यावर संघाने आक्रमणे सुरू केली मात्र त्यांचे तीन प्रयत्न प्रतिस्पर्ध्यांच्या भक्कम बचावामुळे वाचले.