IND vs PAK Asia Cup 2023
आशिया कपमध्ये टीम इंडियाचा पाकिस्तान विरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. कालच्या मॅचमध्ये सुद्धा पावसाने व्यत्यय आणला. त्यामुळे आता पुढे काय होणार? आणि आज पण मॅच झाली नाही, तर कोण फायनलमध्ये पोहोचेल? हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे
काल पाकिस्तानने या मॅचमध्ये टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाने शानदार सुरुवात केली आणि २४.१ ओव्हर्समध्ये टीम इंडियाने २ विकेट गमावून १४७ धावा केल्या आहेत. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली आणि मॅच थांबविण्यात आली त्यामुळे आता रिझर्व्ह डे म्हणजे आज हा सामना खेळला जाईल.
पण रिझर्व्ह डेच्या दिवशी सुद्धा सामना झाला नाही तर? मग टीम इंडियाचा फायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग काय असेल?
तर असं झाल्यास टीम इंडियाला श्रीलंकेविरुद्ध १२ सप्टेंबरला आणि बांग्लादेश विरुद्ध १५ सप्टेंबरला होणारा सामना जिंकावाचा लागेल. पाकिस्तान विरुद्ध मॅच रद्द झाली, तर दोन्ही टीम्सना १-१ पॉइंट मिळेल. टीम इंडियाने श्रीलंका आणि बांग्लादेश विरुद्ध सामना जिंकला, तर त्यांचे एकूण ५ पॉइंट होतील. त्यानंतर टीम इंडिया आरामात फायनल खेळू शकेल.
टीम इंडियाने पण आपल्या आगामी २ही मॅच जिंकल्या, तर ५ पॉइंट होतील. अशा स्थितीत श्रीलंका आणि बांग्लादेश दोन्ही टीम फायनलच्या शर्यतीतून बाहेर होतील. त्यानंतर टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये फायनलचा सामना रंगेल. आतापर्यंत दोन्ही टीम एकदाही आशिया कपच्या फायनलमध्ये आमने-सामने आलेल्या नाहीत.
पाकिस्तान आणि श्रीलंकेने बांग्लादेशला हरवून २-२ गुण मिळवले आहेत. यावेळी दोन्ही टीम्स टीम इंडियाच्या पुढे आहेत. भारत आणि पाकिस्तान सामना रद्द झाला, तर पाकिस्तानला एक पॉइंट मिळेल. दोन सामन्यात त्यांचे तीन पॉइंट होतील. त्यानंतर पाकिस्तानला श्रीलंकेविरुद्ध खेळाव लागेल. ही मॅच जिंकली, तर पाकिस्तानचे ५ पॉइंट होतील.