U20 Volleyball Championship : रिफा, बहरीन येथे सोमवारी २९ ऑगस्ट २०२२ आशियाई खेळाडूच्या U20 व्हॉलीबॉल चॅम्पियनशिपमध्ये भारताने रौप्यपदक जिंकले. भारतीय खेळाडूचा अंतिम सामन्यात इराणकडून पराभव झाला.
U20 Volleyball Championship
भारताला इराणकडून १-३ (१२-२५, १९-२५, २५-२२, १५-२५) असा पराभव पत्करावा लागला. तथापि, भारताने स्पर्धेतील टॉप २ मध्ये स्थान मिळवून २०२३ FIVB व्हॉलीबॉल पुरुष U२१ वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्रता मिळवली.
भारतीय संघाने आपल्या मोहिमेची सुरुवात ३-१ (१९-२५, २५-१९, २५-२१, २५-२३) अशा दोन वेळेच्या चॅम्पियन जपानवर विजय मिळवून केली.
त्यांच्या दुसऱ्या लढतीत त्यांना इराणकडून ०-३ (२०-२५, १०-२५, १९-२५) असा पराभव पत्करावा लागला.
भारतीयांनी ब गटात १ विजय आणि १ पराभवासह दुसरे स्थान मिळवून पुढील फेरीत प्रवेश केला.
ASIA CUP 2022 Points Table | आशिया कप २०२२ पॉईंट टेबल
उपांत्यपूर्व फेरीत भारताने यजमान बहरीनचा २५-२२, २५-१९, २६-२८, २६-२४ अशा चार सेटमध्ये पराभव केला.
भारतीय खेळाडूंनी उपांत्य फेरीत थायलंडचा ३-१ (२५-२१, २३-२५, २५-१८, २५-१७) असा पराभव केला.
या विजयाने 2023 FIVB व्हॉलीबॉल U21 विश्वचषकासाठी त्यांची पात्रता देखील निश्चित केली .
भारतीय संघ ७व्यांदा २०२३ FIVB व्हॉलीबॉल U२१ विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे.