अब्ब ! जसप्रीत बुमराहनं घातलेल्या शर्टची किंमत ऐकून चकित होताल
करोडपती क्रिकेटपटूंसाठी लाखो किमतीचे शर्ट घालणे ही नवीन गोष्ट नाही, परंतु चाहत्यांना त्यांची किंमत कळणे हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय असू शकतो.
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या पाठिच्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. बुमराह नुकत्याच झालेल्या टी-२० वर्ल्डकपमध्येही खेळू शकला नाही आणि त्याची अनुपस्थितीत स्पष्टपणे जाणवली. बांगलादेश दौऱ्यातही बुमराहचा संघात समावेश झालेला नाही.
दरम्यान, त्याने स्वतःचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. फोटोसोबत बुमराहने कॅप्शनमध्ये पंजाबीमध्ये काही ओळीही लिहिल्या आहेत.
या फोटोमध्ये जसप्रीत बुमराहने परिधान केलेल्या शर्टची किंमत जाणून तुम्हाला धक्का बसेल. बालेंसियागा ब्रँडच्या जसप्रीतने परिधान केलेल्या शर्टची किंमत 1,12,768.85 रुपये आहे. एका चाहत्याने या शर्टच्या फोटोचा स्क्रिनशॉट घेऊन त्याची ऑनलाइन किंमतही दिली आहे.
Omg 😳 pic.twitter.com/mW3DFo8ZDl
— CAM GREEN IN SRH (@BeingUk7) December 3, 2022