Sanju Samson ला आयर्लंडकडून ऑफर
भारतीय संघनिवड गेल्या काही दिवसांपासून सातत्याने संजू सॅमसनच्या निवडी वरून वादाच्या भोवऱ्यात अडकत आली आहे. संजू सॅमलनला एका सामन्यात संधी दिली जाते तर लगेच दुसऱ्या दिवशी त्याला बेंचवर बसवले जाते.
संजू सॅमसनला न्याय मिळावा आणि त्याला इतरांप्रमाणे संधी मिळावी यासाठी सोशल मीडियावर देखील जोरदार ट्रेंड होत आहेत.
बांगलादेश दौऱ्यावर त्याला पुन्हा संघातून डावलण्यात आले.
Sanju Samson ला आयर्लंडकडून ऑफर
भारतीय संघात सातत्याने डावलल्या जाणाऱ्या संजू सॅमसनला आयर्लंड क्रिकेट संघाकडून खेळण्याची ऑफर मिळाली आहे.
आयर्लंड क्रिकेट अध्यक्ष म्हणाले की,
‘तो जर आमच्या संघाकडून खेळला तर आम्ही त्याला सगळ्या आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळवू. तो एक दमदार फलंदाज आहे. अशी प्रतिभा खूप कमी लोकांकडे असते. आम्ही त्याला ऑफर देतो की तू आमच्या देशाच्या संघाकडून खेळ. आमच्या संघाला त्याच्यासारख्या कर्णधार आणि फलंदाजाची गरज आहे. जर भारतीय संघ त्याच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर तो आमच्या संघात येऊ शकतो. आम्ही त्याचा आदर करतो आणि आम्ही त्याला सगळे सामने खेळवू.’
दरम्यान, आयर्लंडकडून मिळालेल्या या ऑफरबद्दल संजू सॅमसनला विचारण्यात आल्यावर तो म्हणाला की,
‘सर्वात प्रथम मी आयर्लंड क्रिकेटच्या अध्यक्षांचे आभार मानतो की त्यांनी माझा विचार केला. मात्र मी नम्रपणे ही ऑफर नाकारतोय. मी भारतीय संघाकडून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली आहे. मी इतर कोणत्याही देशाकडून खेळण्यास उत्सुक नाही. मी याचा विचार देखील करू शकत नाही. मी ही ऑफर स्विकारू शकत नाही. मी आयर्लंड क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षांची माफी मागतो .