Miami Open 2022 : बोपण्णा आणि शापोवालोव्ह यांनी जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाच्या जोडीचा ६-३, ७-६ असा सरळ सेटमध्ये पराभव केला आणि मियामी टेनिस ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
रोहन बोपण्णा आणि त्याचा दुहेरीचा जोडीदार डेनिस शापोवालोव्ह यांनी सध्या सुरू असलेल्या एटीपी मियामी ओपनमध्ये जागतिक क्रमवारीत नंबर १ पुरुष दुहेरी संघाचा पराभव केला आहे.
या जोडीने मेट पाविक आणि निकोला मेक्टिक या त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांचा ६-३, ७-६ असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
Miami Open 2022
BOPANNA AND SHAPOVALOV DEFEAT WORLD NO. 1 TEAM!@rohanbopanna/@denis_shapo came out all guns blazing to defeat World No. 1 team of Mate Pavic & Nikola Mektic 63 76 to move into the quarters of the ATP Miami Open Masters.
— Indian Tennis Daily (@IndTennisDaily) March 27, 2022
Big win for Indian Sports! pic.twitter.com/9PDycRysJx
आता उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत त्यांचा सामना नेदरलँडचा वेस्ली कूलहॉफ आणि ग्रेट ब्रिटनचा नील स्कुप्स्की यांच्याशी होईल.