जोस बटलर व सिद्रा अमीन यांनी मारली बाजी
आयसीसीने नोव्हेंबर महिन्यासाठी सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जाहीर केला आहे. यावेळी इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने पुरुष गटात हा पुरस्कार पटकावला आहे. त्याचवेळी पाकिस्तानच्या सिद्रा अमीनला महिला गटात हा पुरस्कार मिळाला आहे.
बटलरने इंग्लंडला T20 विश्वचषकाचे विजेतेपद मिळवून दिले आणि त्याने महिन्यात खेळलेल्या चार T20 पैकी दोन सामन्यांमध्ये पन्नास ओलांडले.
ICC Men’s Player of the Month for November 2022 unveiled.
— ICC (@ICC) December 12, 2022
Details ➡️ https://t.co/GN3sRe5XGE pic.twitter.com/aWwimIjB6e
दरम्यान, पाकिस्तानच्या सिद्रा आमीनला महिला खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले. आमीनने आयर्लंड वनडेमध्ये २७७ धावा केल्या होत्या.
ICC Women’s Player of the Month for November 2022 revealed.
— ICC (@ICC) December 12, 2022
Details ➡️ https://t.co/U9iymCw7X7 pic.twitter.com/IvHBQQBigF