Harmanpreet Kaur captaincy record : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मधील उद्घाटन महिला टी-२० स्पर्धेच्या अंतिम फेरीत बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाकडून नऊ धावांनी पराभूत झाल्याने सुवर्णपदकापासून दूर राहिला.

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली, भारतीय महिला क्रिकेट संघाने २०२० मध्ये ICC महिला T२० विश्वचषक आणि २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
अलिकडच्या वर्षांत मोठ्या फायनलमध्ये भारताचा हा सलग तिसरा पराभव आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली, २०२० मध्ये मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ICC महिला T20 विश्वचषक फायनलमध्ये भारताला यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८५ धावांनी पराभव पत्करावा लागला होता.
यापूर्वी २०१७ मध्ये, ICC महिला विश्व स्पर्धेत भारताला यजमान इंग्लंडकडून केवळ नऊ धावांनी पराभव पत्करावा लागला होता.
परंतू भारतीय महिला क्रिकेट संघ २०२० मधील ICC महिला T२० विश्वचषक आणि २०२२ मधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचल्याबद्दल अभिमान वाटतो.
महिलांच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात मोठ्या फरकाने विजय
हरमनप्रीत कौरचा कर्णधारपदाचा विक्रम
मिताली राजच्या निवृत्तीनंतर नवीन एकदिवसीय कर्णधारपदी नियुक्ती झाल्यानंतर, हरमनप्रीतने आठ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे, सात जिंकले आहेत तर फक्त एकदाच पराभूत झाले आहे. ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये सध्या तिची विजयाची टक्केवारी ८७.५० इतकी आहे.
स्वरूप | मॅच | जिंकले | हरले | टाय | एन.आर | विजय % |
T20Is | ७४ | ४४ | २७ | ० | ३ | ५९.४६ |
वनडे | ८ | ७ | १ | ० | ० | ८७.५० |
कर्णधार म्हणून हरमनप्रीत कौरचा फलंदाजीचा विक्रम
स्वरूप | मॅच | डाव | धावा | एच.एस | सरासरी | SRs | १०० | ५० |
T20Is | ७४ | ६९ | १६१८ | १०३ | ३०.५२ | ११४.१० | १ | ६ |
वनडे | 8 | ७ | ३६४ | १०३ | ७२.८० | ७५.३६ | १ | २ |
आठ एकदिवसीय सामन्यांमध्ये हरमनप्रीत कौरने ७२.८० च्या प्रभावी सरासरीने ३६४ धावा केल्या आहेत ज्यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.
Source – wikipedia