FIFA U-17 WWC INDIA vs USA : फिफा अंडर-१७ महिला विश्वचषक २०२२ स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात अमेरिकेने बाजी मारली आणि मंगळवारी अ गटातील एकतर्फी लढतीत ०-८ असा भारताला पराभव पत्करावा लागला.

मेलिना रेबिम्बासने दोन (९व्या आणि ३१व्या मिनिटाला) तर शार्लोट कोहलरने (१५व्या मिनिटाला), ओन्येका गेमरोने (२३ व्या), गिसेल थॉम्पसन (३९ व्या), एला एमरी (५१ व्या), टेलर सुआरेझ (५९ व्या) आणि कर्णधार मिया भुटा (६२ व्या) मिनिटाला गोल करुन युएसएला ८ गोल करुन दिले.
FULL TIME! Tonight's action in Bhubaneswar draws to a close.
— Indian Football Team (@IndianFootball) October 11, 2022
FT Score: 🇮🇳 0-8 🇺🇸#INDUSA ⚔️ #U17WWC 🏆 #BackTheBlue 💙 #ShePower 👧 #IndianFootball ⚽️ pic.twitter.com/Q4JFwpTwEK
या मोठ्या पराभवामुळे भारताला उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणे कठीण होणार आहे आणि ग्रुप स्टेजमध्ये आजून दोन सामने मोरोक्को (१४ ऑक्टोबर) आणि विजेतेपदाचा दावेदार ब्राझील (१७ ऑक्टोबर) विरुद्ध बाकी आहेत.