ब्राझीलचा कोरियावर मात करीत उपउपांत्य फेरीत प्रवेश
फीफा विश्वचषक 2022 : स्ट्रायकर नेमार संघात परतल्यानंतर बळ मिळालेल्या बलाढ्य ब्राझीलने दक्षिण कोरियावर ४-१ असा विजय मिळवत विश्वकरंडक स्पर्धेच्या उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. उपउपांत्य फेरीत त्यांची लढत क्रोएशियाशी होईल.
ब्राझीलने चारही गोल पूर्वार्धातच केले यामुळे जपाननंतर दुसरा आशियाई संघही स्पर्धेबाहेर गेला आहे. कोरियाने उत्तरार्धात चांगला प्रतिकार करून एक गोल केला.
ब्राझीलने सातव्या मिनिटापासूनच गोल करायला सुरूवात केली. तेराव्या मिनिटाला ब्राझीलला पेनल्टी मिळाली. ही संधी नेमारने साधत आघाडी २-० अशी केली. कोरिया गोलची संधी शोधत होता. पुढे २९ व्या मिनिटाला रिचर्लिसन याने अफलातून गोल करीत आघाडी ३-० अशी केली.
🤙 @neymarjr wasted no time getting up to speed
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 5, 2022
He’s your @Budweiser Player of the Match!#POTM #YoursToTake #BringHomeTheBud @budfootball pic.twitter.com/TNHQhj7gvV
brazil reach in quarter finals
३६ व्या मिनिटाला पक्वेटाने एक अफलातून गोल करीत पूर्वार्धातच ब्राझीलची आघाडी ४-० अशी निर्णायकी केली. कोरियाकडून फाईक सेऊंग हो याने ७६ व्या मिनिटाला गोल केला पण त्याचा गोल व्यर्थ गेला कोरिया संघाला 4-1 आशी हार पत्कारावी लागली.
Brazil crush South Korea 4-1 to reach quarter-finals