ऑस्ट्रेलियाकडून वेस्ट इंडिजचा 164 धावांनी पराभव
ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना यजमान कांगारू संघाने वेस्ट इंडिजचा मोठ्या फरकाने पराभव केला. कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे खेळला गेला. यजमान ऑस्ट्रेलियाने या सामन्यात अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत वेस्ट इंडिजला 164 धावांनी पराभूत केले.
पहिल्या डाव्यात द्विशतक आणि दुसऱ्या डावात शतक करणारा ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅब्युशेन हा सामन्याचा मानकरी ठरला.
पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम फलंदाजी करताना 152.4 षटकात 598/4 धावांवर पहिला डाव घोषित केला. कांगारू संघाकडून मार्नस लबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांनी द्विशतके झळकावली, तर ट्रॅव्हिस हेड 99 धावांवर बाद झाला. वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या डावात 98.2 षटके खेळून 283 धावांत आटोपला.
इतिहास : फिफा विश्वचषक 2022 मध्ये रेफ्री करणारी पहिली महिला कोण आहे?
दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियाने तशीच फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात केवळ 37 षटके फलंदाजी केली व धावफलकावर 182 धावा लावल्या. वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 498 धावांचे लक्ष्य दिले, परंतु कॅरेबियन संघ 333 धावांत गारद झाला आणि ऑस्ट्रेलियाकडून वेस्ट इंडिजचा 164 धावांनी पराभव झाला
Australia win 🎉
— ICC (@ICC) December 4, 2022
Nathan Lyon sends West Indies packing with a match-winning six-for 🔥
Watch the #AUSvWI series live on https://t.co/CPDKNxpgZ3 (in select regions) 📺#WTC23 | Scorecard: https://t.co/YyderoqpP2 pic.twitter.com/3Il9j6hBNL