आशियाई बॉक्सिंग स्पर्धा २०२२ : आशियाई अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या महिलांनी ४ सुवर्ण जिंकली आहेत. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या लवलिना बोरगोहेन (७५ किलो), अल्फिया पठाण (८१ किलोपेक्षा अधिक), परवीन हुडा (६३ किलो), स्विटी (८१ किलो) आणि या चौघींनी चमकदार कामगिरीसह विजेतेपद मिळविले तर मीनाक्षी (५२ किलो) रौप्यपदकाची मानकरी ठरली.
हे ही वाचा : Portugal World Cup 2022 squad : ख्रिस्तियानो रोनाल्डो सोबतचा संघ जाणून घ्या..
आशियाई बॉक्सिंग स्पर्धा २०२२
लवलिना बोरगोहेनचे हे तिसरे आशियाई पदक आहे. यापूर्वी तिने २०१७ आणि २०२१ मध्ये ६९ किलो वजनी गटातून कांस्यपदक जिंकले होते. पॅरिस २०२४ च्या ऑलिम्पिकमधून ६९ किलो वजनी गट रद्द करण्यात आल्यामुळे लवलिनाने ७५ किलो वजन गटाची निवड केली आहे.
पहिल्या अंतिम लढतीत मीनाक्षीला जपानच्या किनोशिता रिंकाकडून पराभव पत्करावा लागला. मीनाक्षीने किनोशिताला झुंज दिली, पण पंचांनी कौल १-४ असा तिच्या विरोधात दिला. त्यानंतर मात्र भारताच्या चारही खेळाडूंनी वर्चस्व राखले व भारताला ४ सुर्वण व १ रौप्य पदक जिंकुण दिले.
🥊🇮🇳 𝐂𝐇𝐀𝐌𝐏𝐈𝐎𝐍𝐒! Lovlina, Parveen, Alfiya, & Saweety ended with 🥇at the ongoing Asian Boxing Championships.
— The Bharat Army (@thebharatarmy) November 11, 2022
🙌 The women's contingent ended their campaign with 7️⃣ medals overall!#LovlinaBorgohain #AsianChampionships #Boxing #TeamIndia #BharatArmy pic.twitter.com/vOJ0XeQzVG