आशियाई एअरगन चॅम्पियनशिप 2022 : मनू भाकर , शिखा नरवाल , ईशा सिंग यांनी गुरुवारी दक्षिण कोरियातील डेगू येथील 15 व्या आशियाई एअरगन चॅम्पियनशिप 2022 मध्ये ज्युनियर महिला पिस्तूल संघात सुवर्णपदक जिंकले.
विजेतेपदाच्या लढतीत या त्रिकुटाने यजमान देशाच्या किम मिन्सियो, किम जुहे आणि यांग जिन यांचा १६-१२ असा पराभव केला.
आशियाई एअरगन चॅम्पियनशिप 2022
महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल सांघिक स्पर्धेत, रिदम सांगवान, पलक आणि युविका तोमर यांना कोरियाच्या किम जांगमी, किम बोमी आणि यू ह्युनयुंग यांच्याकडून 12-16 अशाच फरकाने पराभव पत्करावा लागला आणि रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
More glory for 🇮🇳 in the Asian Airgun Championships 😍
— SAI Media (@Media_SAI) November 17, 2022
Team of Manu, Esha & Shikha defeat 🇰🇷16-12 in 10m AP Women's Junior Team event to bag another 🥇 in the tournament 🔥 pic.twitter.com/CLwHCZEc51
शिखा, ईशा आणि मनू यांनी पात्रतेच्या दोन फेऱ्या मारून अंतिम फेरी गाठली. पहिल्या फेरीत त्यांनी 862 गुणांसह अव्वल स्थान पटकावले ज्याने या स्पर्धेतील आशियाई विक्रमाची बरोबरी केली. त्यांनी दुसऱ्या पात्रता फेरीत तसेच 576 च्या एकत्रित स्कोअरसह पुन्हा अव्वल स्थान पटकावले.