सचिन तेंडुलकरसाठी खास ठरलेला 32 वर्षापुर्वीचा सामना
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याच्या 24 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक महान खेळी खेळलया आहेत. त्यातील अनेक खेळींची आजही आठवण काढली जाते. त्याच्या अनेक खेळी अविस्मरणीय आहेत. त्यातील एक खेळी त्याने 32 वर्षांपूर्वी पुण्यात केली होती.
आसीसीने त्याच्या या खास दिनाचे पोस्ट ट्विटरवर पोस्ट केले आहे
#OnThisDay in 1990, a 17-year-old Sachin Tendulkar scored his first ODI fifty 👏
— ICC (@ICC) December 5, 2020
He was the Player of the Match for his 53 against Sri Lanka that helped India to a six-wicket victory in Pune.
How many 50-plus scores does he have in ODI cricket? 🤓 pic.twitter.com/iUnh45qzvY
5 डिसेंबर 1990 रोजी भारत विरुद्ध श्रीलंका संघात पुण्याच्या नेहरु स्टेडियमवर वनडे मालिकेतील दुसरा सामना झाला होता. या सामन्यात सचिनने त्याच्या वनडे कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले होते.
वाढदिवस विशेष: अंजली भागवत ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठणारी 1ली भारतीय महिला
सचिनने 18 डिसेंबर 1998 ला पाकिस्तानविरुद्ध वनडे पदार्पण केले होते. त्यानंतर सचिनला जवळपास एका वर्षात ५० धावांचा आकडा एकदाही पार करता आला नव्हता. शेवटी ५ डिसेंबर १९९० ला श्रीलंकेविरुद्ध त्याने पहिले अर्धशतक केले. त्या सामन्यात श्रीलंकेने भारताला २२८ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ १४६ धावांवर ३ बाद अशा स्थितीत असताना सचिन फलंदाजीसाठी आला.
त्यावेळी त्याने कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनच्या साथीने भारताचा डाव सांभाळण्यास सुरुवात केली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी केली. पण भारतीय संघाला २ धावांची गरज असताना सचिन ४९ चेंडूत ५२ धावा करुन बाद झाला. या खेळीत त्याने ५ चौकार मारले होते. अझरुद्दीनने नाबाद ५३ धावांची खेळी केली.
सचिनने त्यावेळी गोलंदाजीतही चांगली कामगिरी केली होती. गोलंदाजी करताना त्याने ३९ धावा देत २ विकेट्स घेतल्या होत्या. एवढेच नाही तर सचिनने ४४ धावा करणाऱ्या असंका गुरुसिन्हाचा आणि रुमेश रत्नानायके (१) झेलही घेतला होता. (सचिन तेंडुलकरसाठी खास ठरलेला 32 वर्षापुर्वीचा सामना)