Pro Kabaddi Season 9 : प्रो कबड्डी लीग (पीकेएल ९) ची नववी आवृत्ती ७ ऑक्टोबरपासून सुरू होईल, लीग आयोजक मशाल स्पोर्ट्सने शुक्रवारी जाहीर केले.

Pro Kabaddi Season 9
पीकेएल ९ लीग टप्पा बेंगळुरू, पुणे आणि हैदराबाद येथे होणार आहे. गेल्या वर्षीच्या स्वरूपातील हा बदल आहे जिथे संपूर्ण स्पर्धा बंगळुरूमध्ये बायो-बबलमध्ये खेळली गेली होती.
सीझन ८ जवळजवळ संपूर्णपणे गर्दीविना (करोना महामारी मुळे) पार पडल्यानंतर आगामी हंगामात प्रेक्षकांचे पुनरागमन देखील होईल, असे आयोजकांनी सांगितले.
🚨 Mark your calendars 🚨#vivoProKabaddi Season 9️⃣ is here and we can't wait to welcome you back ❤️ pic.twitter.com/iDMMapz5uR
— ProKabaddi (@ProKabaddi) August 26, 2022
PKL 9 सामन्यांची तिकिटे कशी खरेदी करावी?
प्रो कबड्डी लीगच्या सामन्यांची तिकिटे अद्याप विक्रीला आलेली नाहीत. दरवर्षीप्रमाणे हे सामने इनडोअर स्टेडियमवर होतील. तर, पुण्यात, श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, हैदराबादमध्ये, गचीबावली इनडोअर स्टेडियम आणि बेंगळुरूमध्ये, श्री कांतीरवा स्पोर्ट्स इनडोअर स्टेडियम हे सामने आयोजित करू शकतात.