भारतीय महिला क्रिकेट उपांत्य फेरीसाठी पात्र
चीनमधील हांगझोऊ येथे १९ व्या आशियाई खेळ २०२३ मध्ये आज महिला क्रिकेटच्या उपांत्यपूर्व फेरीतील भारत विरुद्ध मलेशिया सामना पावसामुळे रद्द करावा लागला.
भारताने मलेशियाला १७४ धावांचे लक्ष्य ठेवले होते आणि दुसऱ्या डावात पावसाने खेळ थांबवला मलेशिया संघाने तेव्हा ०.२ षटकात १/० अशी प्रगती केली होती.
भारताचे १७४ धावांचे लक्ष्य मलेशियाला होते, या डावात शफालीने ३९ चेंडूत ६७ धावा केल्या. रिचा घोष (७*) आणि जेमिमाह रॉड्रिग्ज (४७*) नाबाद राहिले.
सामना पुन्हा सुरू झाला नाही, मात्र भारत त्यांच्या उच्च रँकिंगच्या आधारे उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला.
Rain 🌧️ has the final say after India's terrific batting display!
— BCCI Women (@BCCIWomen) September 21, 2023
India march to the semifinals in the #AsianGames 👏👏
Scorecard ▶️https://t.co/c5tw7bD88x#IndiaAtAG22 pic.twitter.com/Wrb3GeAStw
तदपुर्वी मलेशियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शफाली वर्माच्या अर्धशतकामुळे पावसाने विस्कळीत झालेल्या पहिल्या डावात भारताला १७३/२ पर्यंत मजल मारता आली. हवामानाच्या विलंबापूर्वी, कर्णधार स्मृती मानधना २७ धावांवर बाद झाली.
मलेशियाकडून माहिरा इज्जती इस्माईल आणि मास एलिसा या दोघांनीही एक विकेट घेतली.