ICC विश्वचषक आणि SA मालिकेसाठी भारताचा U19 महिला संघ जाहीर
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अंडर-19 T20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. वरिष्ठ संघात आपली प्रतिभा सिद्ध करणाऱ्या हरियाणाच्या शेफाली वर्माची संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
‘अखिल भारतीय महिला निवड समितीने ICC अंडर-19 महिला विश्वचषक आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ‘टी-20I मालिकेसाठी भारताच्या अंडर-19 महिला संघाची निवड केली आहे,” असे बीसीसीआयने एका निवेदनात म्हटले आहे.
🚨 NEWS 🚨: India U19 Women’s squad for ICC World Cup and SA series announced.
— BCCI Women (@BCCIWomen) December 5, 2022
More Details 🔽https://t.co/onr5tDraiq
ICC अंडर-19 महिला विश्वचषकाच्या पहिल्या आवृत्तीत 16 संघ सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत 14 ते 29 जानेवारी 2023 या कालावधीत होणार आहे. भारताला ड गटात दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती आणि स्कॉटलंडसह स्थान देण्यात आले आहे.
प्रत्येक गटातील अव्वल तीन संघ सुपर सिक्स फेरीत प्रवेश करतील, जिथे संघांना सहा जणांच्या दोन गटात ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत जातील, जे 27 जानेवारीला पॉचेफस्ट्रूम येथील जेबी मार्क्स ओव्हल येथे खेळले जातील. याच मैदानावर 29 जानेवारीला अंतिम सामना होणार आहे.
ICC विश्वचषक आणि SA मालिकेसाठी भारताचा U19 महिला संघ जाहीर
- शेफाली वर्मा (कर्णधार), श्वेता सेहरावत (उपकर्णधार), ऋचा घोष (यष्टीरक्षक), जी त्रिशा, सौम्या तिवारी, सोनिया मेहदिया, हर्ले गाला, हर्षिता बसू (यष्टीरक्षक), सोनम यादव, मन्नत कश्यप, अर्चना देवी, पार्शवी चोपड़ा, तीता साधु, फलक नाज, शबनम एमडी, शिखा, नजला सीएमसी, यशश्री।
- राखीव खेळाडू : शिखा, नजला सीएमसी, यशश्री
Squad: Shafali Verma (C), Shweta Sehrawat (VC), Richa Ghosh (WK), G Trisha, Soumya Tiwari, Sonia Mehdiya, Hurley Gala, Hrishita Basu (WK), Sonam Yadav, Mannat Kashyap, Archana Devi, Parshavi Chopra, Titas Sadhu, Falak Naz, Shabnam MD, Shikha, Najla CMC, Yashashree.
— BCCI Women (@BCCIWomen) December 5, 2022