प्रियांका खेडकर व्हॉलीबॉल खेळाडू

नाव - प्रियांका खेडकर जन्मतारिख - १ नोव्हेंबर १९८४ जन्मठिकाण - बुरहानपूर, मध्य प्रदेश

वडील - अशोक खेडकर आई - संध्या खेडकर भाऊ - स्वानंद खेडकर

शाळा - सोमलवाडा, हायस्कुल, नागपुर कॉलेज - एल ए डी, कॉलेज, नागपुर

वयाच्या १७ व्या वर्षी तिने महाराष्ट्र कडून ज्युनिअर स्कुल नॅशनल चॅम्पियनशिप खेळत महाराष्ट्र टीमला कास्य पदक मिळवून दिले.

२००२ मध्ये जुनिअर अ‍ॅशियन चॅम्पियनशिप मध्ये भारतीय संघामध्ये लिबेरो खेळाडू म्हणून स्थान मिळाले.

२००९, २०११, २०१३ सिनिअर अ‍ॅशियन चॅम्पियनशिप मध्ये तिला भारतीय संघाकडून खेळता आले.

२०१० ग्वांगझू येथे झालेल्या अ‍ॅशियन गेम्स मध्ये तिने भारतीय व्हॉलीबॉल संघाचे प्रतिनिधित्व केले.

२०१४ मध्ये इंचॉन येथे झालेल्या आणी २०१८ मध्ये जकार्ता येथे झालेल्या अ‍ॅशियन गेम्स मध्ये ती भारतीय व्हॉलीबॉल संघाकडून खेळली आहे.

पदक

२०१८-२०१९ शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार