विश्वनाथन आनंद बुद्धिबळपटू | Viswanathan Anand Information In Marathi

विश्वनाथन आनंद (Viswanathan Anand Information In Marathi) हे भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहेत. १९८८ मध्ये ते भारताचे पहिले ग्रँडमासटर बनले.

क्रीडा क्षेत्रात मिळणारा सर्वोत्तम असा राजीव गांधी पुरस्कार मिळवणारा ते पहिले खेळाडू आहे. तब्बल ५ वेळा वर्ल्ड चेस चैम्पियनशिप आपल्या नावावर करून त्याने आपल्यातील प्रतिभा सिद्ध केलीये.

वैयक्तिक माहिती

नावविश्वनाथन आनंद
जन्म११ डिसेंबर १९६९
जन्मस्थानमाइलादुत्रयी, तामिळनाडू
वडीलविश्वनाथन अय्यर
आईसुशीला
पत्नीअरुणा आनंद
मुलगाअखिल
शिक्षणपदवीधर
पदग्रँडमास्टर -१९८८
Viswanathan Anand Information In Marathi
Advertisements

जगातील १० सर्वोत्तम गोल्फ कोर्स
Advertisements

प्रारंभिक जीवन

मयिलाडूथराई हे तमिळनाडूमधील एक छोटसं शहर आहे. ११ डिसेंबर १९६९ रोजी विश्वनाथन आनंद यांचा जन्म मयिलाडूथराई या शहरात झाला.

त्याचे वडील विश्वनाथन अय्यर दक्षिण रेल्वेतील निवृत्त मैनेजर तर आई सुशीला देवी बुद्धिबळ प्रशिक्षक आणि प्रभावी समाज सुधारक होत्या. आईमुळेच आनंद बुद्धीबळाकडे आकर्षिला गेला.

विश्वनाथन आनंद ला त्याच्या आईने वयाच्या अवघ्या ६ व्या वर्षापासून बुद्धिबळाचे धडे देण्यास सुरुवात केली. विश्वनाथन आनंद ला मोठा भाऊ शिवकुमार आणि बहिण अनुराधा देखील आहेत.

विश्वनाथन आनंद ने आपले सुरुवातीचे शिक्षण चेन्नईच्या एग्मोरे येथील डॉन बॉस्को मैट्रीक्यूलेशन हायर सेकंडरी स्कूल मधून पूर्ण केलं व कॉमर्स विषयाची पदवी चेन्नई येथीलच लोयोला कॉलेज मधून पूर्ण केली.


मालविका बनसोड बॅडमिंटन खेळाडू

करिअर

 • इसवी सन २००० ते २००२ या कालावधी मध्ये विश्वनाथन आनंद यांनी फिडे बुद्धिबळ चॅम्पियनशिप आपल्या नावावर करत, आपल्या कौशल्याने संपूर्ण जगाला चकित करून ठेवलं आहे.
 • २००७ साली विश्वनाथन आनंद ने World Chess Championship जिंकून अखिल विश्वाला आपली दखल घेण्यास भाग पाडलं, यानंतर बुद्धीच्या या खेळाचा तो निर्विवाद शहंशाह बनला होता.
 • २००८ साली आयोजित World Chess Championship मध्ये विश्वनाथन आनंद ने ब्लादिमीर क्रैमनिक ला हरवून आपल्या यशाची घौडदौड कायम ठेवली. या विजयामुळे तो Chess Championship चा नॉकआउट, टूर्नामेंट आणि मैच जिंकणारा जागतिक बुद्धिबळ इतिहासातील पहिला खेळाडू ठरला.
 • २०१० साली विश्वनाथन आनंद चा सामना बुल्गारिया च्या दिग्गज वेसेलिन टोपालोव समवेत झाला, आणि या स्पर्धेत World Chess Championship चा किताब विश्वनाथन आनंद ने आपल्या नावावर केला.
 • बुद्धिबळ खेळून खेळून विश्वनाथन आनंद यांची बुद्धीत इतकी तल्लक बनली होती. की समोरचा आता कुठलं डाव खेळणार आहे हे त्यांना आधीच कळूनं जायचं आणि आपल्या बुद्धीचा वापर करून ते समोरच्याला चुका करण्यास भाग पाडायचे.
 • याच प्रकारे विश्वनाथन आनंद यांनी २०१२ साली घडलेल्या वर्ल्ड चेस चंपियनशिप मध्ये पुन्हा एकदा दणदणीत विजय मिळवला. 
 • २०१३-१४ ही वर्षं विश्वनाथन आनंद करता निराशाजनक राहीलीत. या दरम्यान त्याला मैग्नस कार्ललन विरुद्ध दोनदा पराजय पत्करावा लागला.
 • २०१८ साली विश्वनाथन आनंद ने कोलकाता येथे पहिला टाटा स्टील बुद्धिबळ भारत ब्लिट्ज टूर्नामेंट किताब जिंकला. या टूर्नामेंट मध्ये आनंद पहिल्या फेरीनंतर चौथ्या स्थानावर होते, पण अखेरच्या दिवशी त्याने ६ फेऱ्या जिंकत तीनदा बरोबरी राखली. परिणामी तो विश्वातील  तिसऱ्या स्थानावर असलेल्या अमेरिकी नाकामुरा च्या बरोबरीत पोहोचला.
 • सलग एक वर्ष आणि नऊ महिने विश्वनाथन आनंद हे संपूर्ण विश्वातील नंबर वन खेळाडू होते. विश्वनाथन आनंद हे सन १९९७, सन १९९८, सन २००३, सन २००४, सन २००७, सन २००८ मध्ये बुद्धिबळाच्या ऑस्कर पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. 

सुकांत कदम पॅरा-बॅडमिंटन खेळाडू

पुरस्कार

 • भारत सरकारचा खेळ पुरस्कार – अर्जुन अवॉर्ड (१९८५)
 • आनंदला भारत सरकारने पद्मश्री (१९८७), पद्मभूषण (२०००) व पद्मविभूषण (२००७) हे पुरस्कार दिले आहेत.
 • भारत सरकारचा सर्वोच्च खेळ पुरस्कार – राजीव गांधी खेळ रत्न (१९९१-१९९२) मिळणारा आनंद हा पहिला खेळाडू आहे.
 • स्पेन सरकारचा सर्वोच्च पुरस्कार – जेमिओ डी ओरो (२५ एप्रिल २००१).
 • चेस ऑस्कर – सहा वेळा (१९९७, १९९८, २००३, २००४, २००७, २००८ आणि २००९).

मोना मेश्राम क्रिकेटर

सोशल मिडीया आयडी

विश्वनाथन आनंद इंस्टाग्राम


जेमिमाह रॉड्रिग्ज क्रिकेटर

विश्वनाथन आनंद ट्वीटर


प्रश्न । FAQ

प्रश्न : आनंदचा IQ किती आहे?

उत्तर : विश्वनाथन आनंद IQ. शीर्ष ग्रँडमास्टर्सचा सरासरी बुद्ध्यांक १८०-१९० (+/- २०) च्या प्रदेशात असल्याचे मानले जाते . 

प्रश्न : भारतातील सर्वोत्तम बुद्धिबळपटू कोण आहे?

उत्तर : विश्वनाथन आनंद

प्रश्न : पहिला ग्रँडमास्टर कोण आहे?

उत्तर : विश्वनाथन आनंद

नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment