विजय हजारे ट्रॉफी 2022 : विजय हजारे ट्रॉफी २०२२ मध्ये सोमवारी तामिळनाडू आणि अरुणाचल प्रदेश यांच्यात सामना झाला. या सामन्यात तामिळनाडू संघाने सर्व विक्रम मोडीत काढले.
प्रथम फलंदाजी करताना तामिळनाडू संघाने 50 षटकांत 2 गडी गमावून तब्बल 506 धावा केल्या. या खेळीने सर्व विश्वविक्रम मोडले.
तामिळनाडूसाठी सलामीवीर एन जगदीशन आणि साई सुदर्शन यांनी पहिल्या विकेटसाठी 416 धावांची भागीदारी केली. या सामन्यात एन जगदीशनने 141 चेंडूत 196.45 च्या स्ट्राईक रेटने 277 धावा केल्या.
विजय हजारे ट्रॉफी 2022
या सामन्यात तामिळनाडू संघाने विश्वविक्रमही केला. तामिळनाडू संघाने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५०६ धावा केल्यानंतर सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम केला आहे. तसेच, आजपर्यंत कोणत्याही संघाने मग ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो वा प्रथम श्रेणी, एवढी मोठी धावसंख्या केली नाही.
यापूर्वी 50 षटकांत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम इंग्लंडच्या नावावर होता, इंग्लंड संघाने 2022 मध्ये नेदरलँड्सविरुद्ध 498 धावा केल्या होत्या.
लिस्ट ए आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या
- ५०६/२ तामिळनाडू वि अरुणाचल प्रदेश (वर्ष २०२२)
- ४९८/४ इंग्लंड विरुद्ध नेदरलँड्स (वर्ष २०२२)
- ४९६/४ सरे वि ग्लॉस्टरशायर (२००७)
- 481/6 इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (वर्ष 2018)
- ४५८/४ भारत अ वि लीसेस्टरशायर (२०१८)
लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
- २७७ – एन जगदीशन (तामिळनाडू वि अरुणाचल प्रदेश), २०२२
- 268 – अॅलिस्टर ब्राउन (सरे विरुद्ध ग्लॅमॉर्गन), 2002
- 264 – रोहित शर्मा (भारत विरुद्ध श्रीलंका), 2014
- 257 – डी’आर्सी शॉर्ट (वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विरुद्ध क्वीन्सलँड), 2018
- 248 – शिखर धवन (भारत अ विरुद्ध दक्षिण आफ्रिका अ), 2013
या सामन्यात एन जगदीशने खेळीत 25 चौकार आणि 15 षटकार मारले. या सामन्यात जगदीशनने चौकारावरून 190 धावा केल्या.