SL vs UAE ICC T20 World Cup 2022 Live Score : १८ ऑक्टोबर रोजी जिलॉन्ग येथे ICC टी-२० विश्वचषक २०२२ च्या पात्रता फेरीच्या ६ व्या सामन्यात श्रीलंकेचा सामना युएई विरुद्ध होणार आहे . हा सामना स्थानिक वेळेनुसार दुपारी १.३०वाजता सुरू होईल.
श्रीलंकेचा पहिला सामना नामिबियाविरुद्ध झाला होता तेव्हा श्रीलंका ५५ धावांनी हरली होता.
पात्रता फेरीत एकूण ८ संघ सहभागी झाले आहेत . श्रीलंका, नामिबिया , UAE, नेदरलँड, वेस्ट इंडीज, झिम्बाब्वे, स्कॉटलंड आणि आयर्लंड हे ८ संघ आहेत.
ICC T20 विश्वचषक 2022 च्या पात्रता फेरीदरम्यान एकूण १२ सामने होतील. अ गटातील संघ गटातील इतर संघांशी एक सामना खेळतील. त्याचप्रमाणे ब गटातील संघ गटातील इतर संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळणार आहेत.
टी-२० वर्ल्डकप २०२२ पॉइंट्स टेबल इन मराठी
SL vs UAE ICC T20 World Cup 2022 Live Score
श्रीलंकेने १५२ धावांपर्यंत मजल मारली. आशियाई चॅम्पियन्ससाठी पथुम निसांकाची महत्त्वपूर्ण ७४ खेळी बदलणारी ठरली आहे.
युएई चा डाव ७३ धावात उरकला, श्रीलंका ७९ धावांनी विजयी
SL vs UAE टी-२० मध्ये हेड टू हेड
- खेळलेले सामने – ३
- श्रीलंका विजयी- १
- युएई जिंकला – २
श्रीलंका वि UAE: सामन्याचे तपशील
- तारीख आणि वेळ: १८ ऑक्टोबर २०२२, दुपारी १.३० वाजता
- स्थळ: GMHBA स्टेडियम, दक्षिण जिलॉन्ग
श्रीलंका वि UAE: प्लेइंग ११
श्रीलंका – कुसल मेंडिस, दिनेश चंडीमल, भानुका राजपक्षे, पथुम निसांका, चारिथ असलंका, दानुष्का गुनाथिलका, वानिंदू हसरंगा, दासुन शनाका, चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमीरा, महेश थेक्षाना.
यूएई – वृत्य अरविंद, वसीम मुहम्मद, चिराग सुरी, आर्यन लाक्रा, विष्णू सुकुमारन, बासिल हमीद, झावर फरीद, अयान अफजल खान, कार्तिक मयप्पन, सुलतान अहमद, संचित शर्मा.
हवामान अहवाल
साउथ जिलॉन्ग १८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि यामुळे सामन्यावर परिणाम होऊ शकतो. सरीमुळे आऊटफिल्डही मंद होईल आणि अशावेळी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होईल.