मिताली राजच्या विक्रमांची यादी | Mithali Raj Cricket Records

Mithali Raj Cricket Records : मिताली राजच्या नावावर महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे हे आपणास माहित आहे का?

मिताली राजच्या नावावर महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा म्हणजे ३३३ सामन्यांमध्ये १०,८६८ धावांचा विक्रम आहे.

मिताली राजच्या विक्रमांची यादी | Mithali Raj Cricket Records

वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी, मिताली राजने १९९९ मध्ये मिल्टन केन्स येथे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) सामन्यात पदार्पणात आयर्लंडविरुद्ध नाबाद ११४ धावांची खेळी करत आंतरराष्ट्रीय मंचावर स्वत:ची घोषणा केली.

३९ वर्षीय मितालीने २३२ एकदिवसीय आणि १२ कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

२००६ मध्ये इंग्लंडविरुद्ध सर्वात लहान फॉरमॅटमध्ये पदार्पण केल्यापासून तिने ८९ T20I सामने खेळले.

जवळपास २३ वर्षांच्या कारकिर्दीत मितालीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३३३ सामन्यांमध्ये १०,८६८ धावा केल्या आहेत. यादरम्यान तिने ८ शतके आणि ८५ अर्धशतके झळकावली आहेत.


ऋतुराज गायकवाड बायोग्राफी मराठी

मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केलेले विक्रम

  • महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा : मिताली राजच्या नावावर महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे . तिने ३३३ सामन्यांमध्ये १०,८६८ धावा केल्या आहेत.
  • महिला वनडेमध्ये सर्वाधिक धावा : भारताच्या माजी कर्णधाराने महिलांच्या ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. मितालीने २३२ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५०.६८ च्या सरासरीने एकूण ७८०५ धावा केल्या.
    • तिने या दरम्यान ७ शतके आणि ६४ अर्धशतके ठोकली आहेत.
  • एकदिवसीय क्रिकेटमध्‍ये सर्वाधिक अर्धशतक : मिताली राजने महिला क्रिकेटमध्‍ये सर्वाधिक अर्धशतकं म्हणजे ६४ अर्धशतकं झळकावली आहेत.
  • महिला एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारी सर्वात तरुण : मिताली राजने महिला वनडेत शतक झळकावणारी सर्वात तरुण खेळाडू होण्याचा विक्रमही केला आहे. १६ वर्षे २०५ दिवसांच्या वयात मितालीने १९९९ मध्ये आयर्लंडविरुद्ध नाबाद ११४ धावा केल्या होत्या.
  • महिला कसोटीत दुहेरी शतक झळकावणारी सर्वात तरुण : १९ वर्षे वयात मिताली राजने २००२ मध्ये टॉंटन येथे इंग्लंडविरुद्ध द्विशतक झळकावले आणि महिला कसोटी क्रिकेटमध्ये ही कामगिरी करणारी सर्वात तरुण खेळाडू ठरली.
  • T20I मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा : मिताली राजने ८९ सामन्यांत ३७.५२ च्या सरासरीने २३६४ धावा केल्या. भारताची T20I कर्णधार हरमनप्रीत कौर १२१ सामन्यात २३१९ धावांसह या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.
  • सहा विश्वचषक खेळणारी एकमेव महिला क्रिकेटपटू : मिताली राज ही सहा ICC महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भाग घेणारी एकमेव महिला क्रिकेटर आहे – २०००, २००५, २००९, २०१३, २०१७ आणि २०२२.
  • महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने : राजने १५५ सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले असून ८९ जिंकले आहेत तर ६३ पराभवांचा सामना करावा लागला आहे.
  • कोणत्याही खेळाडूसाठी सर्वात लांब एकदिवसीय कारकीर्द : २२ वर्षे आणि २७४ दिवसांची, मिताली राजने आता कोणत्याही खेळाडूसाठी सर्वात लांब एकदिवसीय कारकीर्दीचा विक्रम केला आहे. राजने तिचा शेवटचा वनडे २०२२ ICC महिला विश्वचषक क्राइस्टचर्च येथील हॅगली ओव्हल येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला.

रिया मुखर्जी बॅडमिंटनपटू

मिताली राज: आंतरराष्ट्रीय क्रिकेट आकडेवारी

स्वरूपमॅचडावधावासर्वोच्च
धावसंख्या
सरासरी१००५०
कसोटी१२१९६९९२१४४३.६८
वनडे२३२२११७८०५१२५*५०.६८६४
टी-२०८९८४२३६४९७*३७.५२१७
आंतरराष्ट्रीय क्रिकेट आकडेवारी
Advertisements

आजची मिताली राजच्या विक्रमांची यादी | Mithali Raj Cricket Records बद्दलची माहिती आपल्याला आवडली आसल्यास आपल्या मित्र मैत्रणींसोबत नक्की शेअर करा…

नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment