भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिका । Ind Vs NZ Schedule In Marathi

Ind Vs NZ Schedule In Marathi

भारतीय संघाविरुद्ध ३ सामन्यांची टी-२० आणि २ सामन्यांची कसोटी मालिका ( Ind Vs NZ Schedule In Marathi ) खेळण्यासाठी न्यूझीलंडचा क्रिकेट संघ दाखल झाला आहे.

१७ नोव्हेंबर पासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ३ सामन्यांची टी-२० मालिका सुरू होत आहे. टी-२० मालिका झाल्यानंतर कसोटी मालिका २५ नोव्हेंबरपासून सुरु होईल.

विराट कोहलीने टी-२० वर्ल्डकपनंतर टी-२० संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर आता ही जबाबदारी रोहित शर्माकडे देण्यात आली आहे. त्याच बरोबर राहुल द्रविड हे संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक असतील.

याआधी रोहितकडे असलेली उपकर्णधारपदाची जबाबदारी केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे. या मालिकेसाठी विराट कोहली, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि रविंद्र जडेजा यांना विश्रांती देण्यात आली आहे.

कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी विराट उपलब्ध असणार नाही. त्याच्या जागी अजिंक्य रहाणे नेतृत्व करले. तर रोहित शर्मा संपूर्ण कसोटी मालिकेसाठी उपलब्ध असणार नाही.


किकेट प्रशिक्षक यादी

टी-२० मालिकेचे वेळापत्रक

पहिली मॅच– १७ नोव्हेंबर, जयपूर
दुसरी मॅच– १९ नोव्हेंबर, रांची
तिसरी मॅच– २१ नोव्हेंबर, कोलकाता

(या सर्व लढती संध्याकाळी ७ वाजता सुरू होतील)


वनडे द्विशतक यादी

कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी- २५ ते २९ नोव्हेंबर, कानपूर
दुसरी कसोटी- ३ ते ७ डिसेंबर, मुंबई

(दोन्ही कसोटी सकाळी ९.३० पासून)


Ind Vs NZ Schedule In Marathi

टी-२० मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ-

  • रोहित शर्मा (कर्णधार)
  • केएल राहुल (उपकर्णधार)
  • ऋतुराज गायकवाड
  • श्रेयस अय्यर
  • सूर्यकुमार यादव
  • ऋषभ पंत
  • इशान किशन
  • वेंकटेश अय्यर
  • अक्षर पटेल
  • युजवेंद्र चहल
  • आर अश्विन
  • आवेश खान
  • भुवनेश्वर कुमार
  • दीपक चाहर
  • हर्षल पटेल
  • मोहम्मद सिराज

कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ-

  • अजिंक्य रहाणे (कर्णधार)
  • केएल राहुल
  • मयांक अग्रवाल
  • शुभमन गिल
  • श्रेयस अय्यर
  • ऋद्धिमान साहा
  • केएस भरत
  • रविंद्र जडेजा
  • आर अश्विन
  • जयंत यादव
  • इशांत शर्मा
  • उमेश यादव
  • मोहम्मद सिराज
  • प्रसिद्ध कृष्णा

नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment