BWF World Championships 2022 : BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२२ खेळाडू, वेळापत्रक, कुठे पाहायचे?

BWF World Championships 2022 : २२ ऑगस्टपासून टोकियो येथे होणाऱ्या २०२२ BWF वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतीय शटलर्स चांगली कामगिरी बघायला नक्कीच मिळेल .

भारतीय दृष्टिकोनातून, राष्ट्रकुल २०२२ चा चॅम्पियन लक्ष्य सेन आणि माजी नंबर वन खेळाडू किदाम्बी श्रीकांत हे सर्वात मोठे दावेदार मानले जातात. 

BWF World Championships 2022 : BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२२ 
Advertisements

२०२१ च्या चॅम्पियनशिपमध्ये, लक्ष्य आणि किंदाबी उपांत्य फेरीत आमनेसामने आले, जिथे लक्ष्याला पराभवानंतर कांस्यपदकावर समाधान मानावे लागले आणि अंतिम फेरीत किदांबीला व्हिक्टर एक्सेलसेनकडून पराभव पत्करावा लागला. 


इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया संघाची घोषणा, कोण कोण टीम मध्ये?

BWF World Championships 2022

पीव्ही सिंधूला राष्ट्रकुल खेळादरम्यान झालेल्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे . या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत एकूण २६ भारतीय शटलर्स भाग घेणार आहेत.

लक्ष्य सेन आपला प्रभावी फॉर्म कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल कारण त्याचा सामना डेन्मार्कच्या एचके विटिंगसशी होणार आहे. एचएस प्रणॉयची आज पहिल्या फेरीत ऑस्ट्रियाच्या एल रेबरशी लढत होईल.

पुरुष एकेरी गटात गेल्या वर्षीच्या जागतिक चॅम्पियनशिपमधील गतविजेत्या किदाम्बी श्रीकांतचा समावेश आहे. श्रीकांत उद्या पहिल्या सामन्यात आयर्लंडच्या एन गुयेनशी भिडणार आहे.

साई प्रणीतला कडवे आव्हान पेलावे लागणार आहे कारण तो चिनी तैपेईच्या चाऊ तिएन चेनशी टक्कर देणार आहे.

महिला एकेरी विभागात सायना नेहवाल आणि मालविका बनसोड या दोन खेळाडूंचा समावेश आहे. सायना नेहवालची मुकाबला हाँगकाँगच्या एनवाय च्युंगशी होईल आणि ती विजयासह स्पर्धेची सुरुवात करेल.

महिला दुहेरी विभागात पूजा दांडू आणि संजना संतोष, अश्विनी पोनप्पा आणि सिक्की रेड्डी, ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या ३ जोडींचा समावेश आहे.

मनू अत्री आणि सुमित रेड्डी यांची पहिल्या फेरीत जपानच्या हिरोकी ओकामुरा आणि ओनोदेरा यांच्याशी लढत होईल.

कृष्णा प्रसाद गर्गा आणि विष्णुवर्धन यांचा सामना फॅबियन डेलरू आणि विल्यम व्हर्जर यांच्याशी होईल कारण त्यांना पहिल्या फेरीत बाय बाय केले गेले आहेत.


ASIA CUP 2022 Points Table | आशिया कप २०२२ पॉईंट टेबल

BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२२ साठी भारतीय संघ

पुरुष एकेरी : लक्ष्य सेन, किदाम्बी श्रीकांत, बी साई प्रणीत आणि एचएस प्रणॉय


महिला एकेरी: सायना नेहवाल आणि मालविका बनसोड


पुरुष दुहेरी: चिराग शेट्टी/सात्विकसाईराज रंकीरेड्डी, मनू अत्री/बी सुमीथ रेड्डी, कृष्णा प्रसाद गरगा/विष्णुवर्धन गौड पंजुला, एमआर अर्जुन/ध्रुव कपिला


महिला दुहेरी: त्रिशा जॉली/गायत्री गोपीचंद, अश्विनी पोनप्पा/एन सिक्की रेड्डी, अश्विनी भट/शिखा गौतम, पूजा दांडू/संजना संतोष


मिश्र दुहेरी: ईशान भटनागर/तनिषा क्रास्टो आणि व्यंकट गौरव प्रसाद/जुही देवांगन


BWF World Championships 2022

BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप 2022 भारतात कोठे पाहायचे?

BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२२ चे सामने भारतात Sports18 आणि DD Sports TV चॅनेलवर थेट प्रक्षेपित केले जातील.

BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२२ चे लाइव्ह स्ट्रीमिंग Voot आणि Jio TV वर उपलब्ध असेल.

नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment