प्रियांका खेडकर व्हॉलीबॉल खेळाडू | Priyanka Khedkar Information In Marathi

प्रियांका खेडकरचा (Priyanka Khedkar Information In Marathi) जन्म १ नोव्हेंबर १९८४ रोजी भारतात झाला, ती एक भारतीय व्हॉलीबॉल खेळाडू आहे.

तिने २०१० आशियाई खेळ आणि २०१४ आशियाई खेळांमध्ये भाग घेतला होता. 

वैयक्तिक माहिती । Priyanka Khedkar Personal Information

नावप्रियांका खेडकर
जन्मतारिख१ नोव्हेंबर १९८४
जन्मठिकाणबुरहानपूर, मध्य प्रदेश
मुळ गावनागपुर, महाराष्ट्र, भारत
उंची१६६ सेमी
वजन५८ किलो
वडीलअशोक खेडकर
आईसंध्या खेडकर
भाऊस्वानंद खेडकर
शाळासोमलवाडा, हायस्कुल, नागपुर
कॉलेजएल ए डी, कॉलेज, नागपुर
Priyanka Khedkar Information In Marathi
Advertisements

Advertisements

सुरवातीचे जीवन

प्रियांका खेडकरचा जन्म १ नोव्हेंबर १९८४ रोजी बुरहानपूर, मध्य प्रदेश, भारत येथे झाला, ती एक भारतीय व्हॉलीबॉल खेळाडू आहे.

तिचे शालेय शिक्षण सोमलवाडा, हायस्कुल, नागपुर येथून झाले व तिने तिचे ग्रेजुएशन एल ए डी, कॉलेज, नागपुर येथून केले.

तिच्या वडीलाचे नाव अशोक खेडकर ते बॅंकमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात व तिची आई संध्या खेडकर या स्वत: एक व्हॉलीबॉल खेळाडू होत्या व त्यांना कॉलेजमध्ये गोल्डन ज्युबिली अ‍ॅवार्ड पण मिळाला होता. तिच्या भावाचे नाव स्वानंद खेडकर तो एक व्हॉलीबॉल खेळाडू आहे आणी तो महाराष्ट्र कडून नॅशनल टीमा ला रिपेझेंट करतो.

ती लहानपणापासून व्हॉलीबॉल खेळत होती तिचा खेळ बघून तिच्या आईने तिला नागपुर च्या प्रसिध्द व्हॉलीबॉल क्लब मध्ये तीला अ‍ॅडमिशन घेतली.


२०२२ मधील भारतातील प्रमुख क्रीडा स्पर्धा

करिअर

Priyanka Khedkar Information In Marathi

वयाच्या १७ व्या वर्षी तिने महाराष्ट्र कडून ज्युनिअर स्कुल नॅशनल चॅम्पियनशिप खेळत महाराष्ट्र टीमला कास्य पदक मिळवून दिले.

१९९९ मध्ये सब ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये २० वर्षानंतर महाराष्ट्र महिला व्हॉलीबॉल टीमला सुर्वण पदक मिळाले त्या टीमची ती खेळाडू होती. याचा खेळामध्ये तीला बेस्ट अ‍टॅकर म्हणून सन्मानित करण्यात आले.

तिच्या या सारख्या उत्तम कामगरीमुळे तिला भारतीय व्हॉलीबॉल संघात स्थान मिळाले.

२००२ मध्ये जुनिअर अ‍ॅशियन चॅम्पियनशिप मध्ये भारतीय संघामध्ये लिबेरो खेळाडू म्हणून स्थान मिळाले.

२००९, २०११, २०१३ सिनिअर अ‍ॅशियन चॅम्पियनशिप मध्ये तिला भारतीय संघाकडून खेळता आले.

२०१० ग्वांगझू येथे झालेल्या अ‍ॅशियन गेम्स मध्ये तिने भारतीय व्हॉलीबॉल संघाचे प्रतिनिधित्व केले.

२०१४ मध्ये इंचॉन येथे झालेल्या आणी २०१८ मध्ये जकार्ता येथे झालेल्या अ‍ॅशियन गेम्स मध्ये ती भारतीय व्हॉलीबॉल संघाकडून खेळली आहे.


जगातील शीर्ष १० क्रिकेट संघ
Advertisements

पदक

  • २०१८-२०१९- शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार
  • २०१६ – गुव्हाटी, भारत -साऊथ अ‍ॅशियन खेळ – सुर्वण पदक
  • गोवा – लुसोफोनिया गेम्स – सुर्वण पदक
  • भारतीय रेल्वे संघाकडून खेळून – ९ सुर्वण पदक
  • महाराष्ट्र टीमकडून खेळून नॅशनल गेम्स मध्ये कास्य पदक
  • २००२ – नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये – कास्य व रौप्य पदक

संगीता फोगट कुस्तीपटू

सोशल मिडीया आयडी

प्रियांका खेडकर इंस्टाग्राम अकाउंट


नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment